covid 19 test pune Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ओमिक्रॉनचे १९८ तर कोरोनाचे ५३६८ नवे रुग्ण

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले.

सुधीर काकडे

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या (Covid19) वाढत्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासांत मुंबई शहरात कोरोनाचे 3671 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, जे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा सुमारे 46 टक्क्यांनी जास्त आहेत. मुंबईत सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 11360 आहे. मुंबईत आतापर्यंत 16375 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 5368 रुग्ण आढळले. गेल्या 24 तासात राज्यात 22 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात ओमिक्रॉन (Omicron) बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात ओमिक्रॉनचे 198 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी 190 प्रकरणं एकट्या मुंबईत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 450 रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या निवेदनानुसार, नायजेरियाला गेलेल्या 52 वर्षीय व्यक्तीचा 28 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि या व्यक्तीच्या नमुन्यात व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराची पुष्टी झाली आहे. निवेदनात म्हटले आहे की, व्यक्तीच्या मृत्यूचा संसर्गाशी काहीही संबंध नाही. निवेदनानुसार, रुग्णाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते गेल्या 13 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT