CM-Uddhav-Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

रुग्णसंख्या वाढतेय! रात्री दहाला मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना आणि ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) नव्या प्रकरणांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज रात्री 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोव्हीड टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयीतल जनसंपर्क कक्षाने दिली आहे.

मोदींचीही आढावा बैठक

देशात ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या संसर्गबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आजच्या घडीला देशात ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या २८४ वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचं वाढतं प्रमाणं हे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ शकतं या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली ओमिक्रॉन आढावा बैठक राजधानीत सुरु आहे. या बैठकीला नीती आयोगाचे (Niti Aayog) सदस्य उपस्थित आहेत.

मोदींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दक्षता समिती नेमण्याची सूचना केली असून कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सणांनिमित्त होणाऱ्या गर्दीत कोविड नियमावलीचं योग्य पालन होतंय की नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच कन्टेन्मेंट झोन तयार करण्याच्या आणि नाईट कर्फ्यू लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेशात नाईट कर्फ्यू

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मध्य प्रदेशमध्ये रात्री कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आला आहे. आज रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) हा नाईट कर्फ्यू असणार आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता मध्य प्रदेशा राज्य सरकारने खबरदारी म्हणून हा नाईट कर्फ्यू लागू केला आहे.

जगभरातील स्थिती

- ओमिक्रॉनचा संसर्ग १०६ देशांत पसरला

- चीनमध्ये शिआन शहरात लॉकडाउन

- ओमिक्रॉनवर लसीसाठी अॅस्ट्राझेनेकाकडून संशोधन सुरू

- नाताळापूर्वी नवे निर्बंध न लावण्याचा ब्रिटनचा निर्णय

- डेल्टापेक्षा ओमिक्रॉन कमी `संहारक` असल्याचा ब्रिटनमधील संशोधनातील निष्कर्ष

- दक्षिण कोरियात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १०९ रुग्णांचा मृत्यू, आणखी ६९१९ जणांना संसर्ग, यात ओमिक्रॉनचे १२ रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT