MLA Devendra Kothe

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर आमदार देवेंद्र कोठे यांनी विविध विषयांवर सभागृहात साडेआठ मिनिटे भाषण केले. त्यात आयटी पार्क, उड्डाणपूल, १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या चाळींसाठी लावलेला बी-टू माफ करणे, शहरातील ६५ कोटींचे डीपी रस्ते, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व गोतस्करी अशा विषयांचा समावेश होता. तत्पूर्वी, त्यांनी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचाही विषय उपस्थित केला होता.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील १४ मोठ्या चाळींच्या पुनर्विकासासाठी ‘बी-टू’ची अट रद्द करावी. दहा वर्षांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेले सोलापुरातील दोन्ही उड्डाणपुलांचे काम भूसंपादन होऊन तातडीने सुरु व्हावे. तसेच सोलापुरातील नियोजित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय देखील आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु व्हावे, अशा प्रमुख मागण्यांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी नागपूरच्या अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर आमदार देवेंद्र कोठे यांनी विविध विषयांवर सभागृहात साडेआठ मिनिटे भाषण केले. त्यात आयटी पार्क, उड्डाणपूल, १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या चाळींसाठी लावलेला बी-टू माफ करणे, शहरातील ६५ कोटींचे डीपी रस्ते, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व गोतस्करी अशा विषयांचा समावेश होता. तत्पूर्वी, त्यांनी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचाही विषय उपस्थित केला होता.

आमदार कोठेंच्या प्रमुख मागण्या...

  • १) ब्रिटिश काळातील १००-१२५ वर्षांपूर्वीच्या शहराच्या मध्यवर्ती भागात १४ मोठ्या चाळी आहेत. तेथे १० हजार कामगार रहायला असून त्या चाळींची पुनर्विकास आवश्यक आहे. त्यासाठी सरकारला एक रुपयाही द्यावा लागणार नाही, पण बी-टूची अट काढून टाकावी.

  • २) क आणि ड वर्ग महापालिकांच्या हद्दीत डीपी रोड, रिंग रोडसाठी निधी उपलब्ध नसल्याच्या नियमाचा फटका सोलापूरला बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने डीपी रोड करण्यासाठी विशेष योजना आखावी आणि त्यातून १२ मीटरपेक्षा जास्त मोठ्या रस्त्यांचा विकास करावा.

  • ३) केंद्र शासनातर्फे सोलापूर महापालिकेला १०० इलेक्ट्रिकल बस मंजूर झाल्या आहेत. सध्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरु आहे. त्या बस शहराला प्राधान्यक्रमाने मिळाव्यात.

गो तस्करांची वाहने स्क्रॅप करावीत

महाराष्ट्र शासनाने गो तस्कारांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाया केल्या जात आहेत. पण, सोलापूर सीमावर्ती जिल्हा असल्याने अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गो तस्करी होते. ज्या गाडीतून गो तस्करी होते, ती गाडी दोनपेक्षा जास्त कारवाईत आढळल्यास ती स्क्रॅप करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचे मोठे सहकार्य

सीना नदीला यंदा ७० वर्षांनंतर प्रथमच मोठा महापूर आला. त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेऊन शेतकरी, नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मोठी मदत केली. तसेच सोलापूरची विमानेसवा, आयटी पार्क, पाणीपुरवठा अशा कामांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढत आहेत.

- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT