Creation of 2 thousand new posts for prisons in state maharashtra news esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : राज्यातील कारागृहांसाठी नव्याने 2 हजार पदनिर्मिती; नाशिकमध्ये नवीन प्रादेशिक कार्यालय

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News : राज्यातील एकूण ६० कारागृहांकरिता नवीन दोन हजार पदनिर्मिती करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. त्यानुसार गृह विभागाने शुक्रवारी (ता. ६) शासन आदेश पारित केला आहे. परिणामी, राज्यातील तुरुंगांना अल्प मनुष्यबळात जादा कामाचा बोजा वाहून न्यावा लागत होता. हा मनुष्यबळाचा प्रश्न आता सुटणार आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी एकूण २३ विविध पदांचा समावेश आहे. तसेच, कारागृह विभागांतर्गत मध्य विभाग या प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन करून जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील कारागृहांसाठी नाशिक येथे नवीन प्रादेशिक कार्यालय निर्माण करण्यास या परिपत्रकानुसार तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. (Creation of 2 thousand new posts for prisons in state maharashtra news)

राज्यातील कारागृह विभागातील कारागृहांच्या वर्गीकरणानुसार नऊ मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा कारागृहे- २८, विशेष कारागृह- १, किशोर सुधारालय (नाशिक)- १, महिला कारागृह- १, खुली कारागृहे- १९ आणि खुली वसाहत (आटपाडी)- १ अशी एकूण ६० कारागृहे आहेत. १२ ऑगस्ट २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे कारागृह विभागाचा पाच हजार ६८ पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आला असून, सद्यस्थितीत कारागृहातील बंदिस्त बंद्यांच्या अधिकृत क्षमतेपेक्षा अतिरिक्त बंदी कारागृहात बंदीवासात आहेत.

क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक कैद्यांमुळे कारागृह व्यवस्थापनाला प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. वस्तुस्थिती विचारात घेता कारागृह विभागात विविध संवर्गांत नवीन पदनिर्मितीची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. ३) आयोजित बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागात सद्यस्थितीत मंजूर पाच हजार ६८ पदे वगळता विविध संवर्गांत तब्बल दोन हजार नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.

प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन

कारागृह विभागांतर्गत असलेल्या मध्य विभाग या प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन करून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अहमदनगर ही जिल्हा कारागृहे, विसापूर खुले जिल्हा कारागृह व किशोर सुधारालय, नाशिक या संस्थांच्या समावेशासह नाशिक येथे नवीन प्रादेशिक कार्यालय निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. परिपत्रकावर गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.

जळगाव कारागृहासाठी अपेक्षित पदनिर्मिती

तुरुंग अधिकारी श्रेणी १- पद १

तुरुंग अधिकारी श्रेणी २- पद १

वैद्यकीय अधिकारी वर्ग ३- पद १

मिश्रक ः पद १

हवालदार ः पदे ३

कारागृह शिपाई ः पदे १५

परिचारक ः पद १

एकूण ः २३ पदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT