Rohit Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: अहमदनगरच्या नामांतराचे श्रेय कोणाला? रोहित पवारांनी सांगितलं; राजकारण तापण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर: औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतरानंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

या नामांतराचे श्रेय कोणत्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षाने घेऊ नये. याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत. नामांतराचे श्रेय हे जनतेचे आहे, असे प्रतिपादन कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले.

आमदार रोहित पवार यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, की अहमदनगर जिल्ह्याचे नाव हे अहिल्यानगर केलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या गोष्टीचं आपण स्वागत करतो. कोणताही जातीय धार्मिक भेदभाव न बाळगता सामान्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं आहे.

त्यांचा जन्म चौंडी (ता. जामखेड) या ठिकाणी झाला. जिल्ह्याचे नाव हे त्यांच्या नावाने दिलं असेल तर त्याचे स्वागत आहे, पण त्याचं श्रेय कोणत्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षाने घेऊ नये. याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत.

चौंडीला जो शासकीय कार्यक्रम झाला, तिथे सर्व नागरिक आले होते. त्यातले कर्जत- जामखेडचे नागरिक, काही मान्यवर यांनी एकत्र येऊन भोजनाची व्यवस्था केली होती. आम्ही जे करतो ते समाजकारण करतो. कारण त्या ठिकाणी आम्ही जेवणाची व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तिथे डॉक्टरांची व्यवस्था केली.

रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. सरकारकडून तिथं हारांचंदेखील नियोजन नव्हतं. हेसुद्धा गावकरी आणि आम्हाला करावं लागलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तिथे आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला वंदन करत असताना बूट काढल्यानंतर नियोजनसुद्धा योग्य पद्धतीने झालं नव्हतं. जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात अनेक उणिवा होत्या, अशी टीका आमदार पवार यांनी केली.

राजकीय वक्तव्य केले नव्हते

गेल्या वर्षी जो कार्यक्रम केला, त्यात कोणतंही राजकीय वक्तव्य आम्ही केलं नव्हतं. कार्यक्रम शासनाकडून झाला नव्हता. तो व्यक्तिगत लोकप्रतिनिधी आणि सर्वांनी मिळून केला होता. तो कार्यक्रम हा भाविकांसाठी होता. जे समाज बांधव आहेत, जे विविध क्षेत्रांमध्ये चांगलं काम करतात, त्यांचा सत्कार गेल्या वर्षी आम्ही तिथे केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT