speculation
speculation 
महाराष्ट्र

देशातील क्रिकेट सट्ट्याची ‘लिंक’ अकोल्यातून

सकाळ वृत्तसेवा

अकोला - क्रिकेट सट्ट्याची देशभरातील ‘लिंक’ अकोल्यातून असल्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना यश आले. सट्ट्याचे मुख्य लाइनवर रेट देणाऱ्याचे काम अकोल्यातून होत असल्याची माहिती या कारवाईतून उघड झाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. ६) दुपारी हा छापा टाकला. यामध्ये एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक केली. 

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आगर वेस येथील संदीप विठ्ठलराव वानेरे हा राहत असलेल्या सागर अपार्टमेंटमधील दुसऱ्या माळ्यावरील क्रमांक ०८ च्या सदनिकेमध्ये गुरुवारी कारवाई केली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या क्रिकेट सामन्याच्या निकालावर सट्टा लावण्याचे व त्यासंदर्भातील दर निश्‍चित झाल्याची माहिती देण्याचे काम येथून सुरू होते. ही माहिती मिळाल्यावर विशेष पथक प्रमुख पोलिस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या नेतृत्वात पथकाने संदीप वानेरे याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी येथून सट्टा लावण्यासाठी असलेल्या मुख्य लाइनचा वापर करून खायवाडी करणे आणि दरांबाबत माहिती देण्याचे काम सुरू होते. येथून थेट नागपूर, कोल्हापूर, सांगलीपर्यंतच्या बुकींसोबत तो संपर्कात होता. त्याच्याकडून ४३ मोबाईल (एक लाख) एलईडी टीव्ही, रिमोट, दोन सुटकेस, सेटटॉप बॉक्‍स, एक्‍स्टेन्शन बॉक्‍स असा एकूण एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी संदीप वानेरेने या कारभारात गुंतलेले त्याचे साथीदार जिग्नेश मेहता, नीलेश कारिया यांची नावे सांगितली. 

४८ तासांत दुसरी कारवाई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यांवर खायवाडी सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर विशेष पथकाने बुधवारी (ता. ५) छापा टाकला. यामध्ये दोघांना अटक करून ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कारवाई करून २४ तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी गुरुवारी विशेष पथकाने मुख्य लाइन चालविणाऱ्यास अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT