Crime News 
महाराष्ट्र बातम्या

Crime News : लिफ्टच्या बहाण्याने पोलिस अधिकाऱ्याकडून मित्राच्या बायकोचीच छेड; गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडवून घडना समोर आली आहे. नाईट ड्युटीवर असताना मित्राच्या पत्नीची छेड काढल्याच्या आरोपानंतर औरंगाबाद शहर पोलीस दलातील 'एसीपी'वर शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. Crime News news in marathi

नाईट ड्युटीवर असतांना ढुमे यांनी रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना ओळखीचा एक मित्र भेटला. तो मित्र त्याच्या बायकोसोबत तिथे आला होता. हॉटेलमधून निघताना ढुमेंनी, माझ्याकडे गाडी नाही, मला लिफ्ट द्या, अशी विनंती मित्राला केली. त्यानंतर गाडीत बसताच ढुमे यांनी समोर बसलेल्या मित्राच्या पत्नीच्या पाठिवरून हात फिरवत विनयभंग करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.

ढुमे ऐवढ्यावरच न थांबता, पुढे आल्यावर त्यांनी मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला अशी मागणी केली. घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे, असं म्हणत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. त्यावेळी त्याने तिथे देखील महिलेची छेड काढली. तसेच महिलेच्या पतीला मारहाण केली, असा आरोप करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Dham Temple Tragedy : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू; गर्दीत विजेची तार पडली अ्न...

Jaggery Industry Law: गूळ उद्योगासाठी आता स्वतंत्र कायदा; साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठविणार

Nashik Sisters Drown : आई लगेच येईल, सांगून डॉक्टर बाबा दवाखान्यात गेले; 2 चिमुकल्या मुलींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी; आज पहिला दौरा

Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

SCROLL FOR NEXT