Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News : कर्जासाठी तारण ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री ; गुन्हा दाखल

Crime News : आठ लाख ९० हजार रुपये रक्कम आरटीजीएसद्वारे त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले

डी.के वळसे पाटील

Crime News : स्वतःच्या जमिनीवर पतसंस्थेतुन कर्ज काढून तारण ठेवलेली आणि तीच जमीन दुसऱ्याला विकुन पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार किसन बाबुराव खेबडे (रा.साकोरे ता.आंबेगाव) याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथील श्रीकृष्ण ग्रामीण पतसंस्थेचे वसुली अधिकारी निलेश हांडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

श्रीकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा मंचर यांच्याकडे किसन बाबुराव खेबडे, सहकर्जदार स्वप्नाली किसन खेबडे यांनी ता.१४.मार्च २०२३ रोजी दहा लाख रुपये कर्ज मिळावे यासाठी अर्ज केला होता. सदर अर्जानुसार ता.२० मार्च २०२३ रोजी ठरावानुसार कर्ज मंजूर करण्यात आले होते. इचकेवाडी (ता.शिरूर) येथील किसन खेबडे यांच्या नावे असलेल्या जमिनीचा गट क्रमांक २९२ क्षेत्रातील जमिनीचा सातबारा तारण म्हणून दिला होता.

पतसंस्थेने त्यांना ता.१२ एप्रिल २०२३ रोजी आठ लाख ९० हजार रुपये रक्कम आरटीजीएसद्वारे त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले. उर्वरित एक लाख दहा हजार रुपये रक्कम पतसंस्थेच्या खेबडे यांच्या बचत खात्यावर वर्ग केली. या कर्जासाठी त्यांना जामीनदार दत्तात्रय मोढवे व संदीप कडुसकर (दोघे रा. साकोरे ता.आंबेगाव) हे जामीनदार होते.

खेबडे यांनी पतसंस्थेच्या परस्पर बाबुराव सगाजी इचके (रा.इचकेवाडी ता.शिरूर) यांच्याशी जमिन विक्रीचा व्यवहार केला. पतसंस्थेची फसवणूक केली.असे पतसंस्थेचे वसुली अधिकारी निलेश हांडे फिर्यादीत नमूद केले आहे. शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT