Crime  sakal
महाराष्ट्र बातम्या

Crime news : संभाजीनगर हादरलं! विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार

भावांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजेश नागरे

पाचोड : शेतात सरपण आणण्यासाठी गेलेल्या बावीसवर्षीय विवाहित महिलेस एकटी पाहून तिघा सख्ख्या भावांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (ता.२०) पारुंडी (ता.पैठण) येथे घडली असून पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुरुवारी (ता.२२) रात्री ''त्या'' नराधम भावांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नितीन बाबासाहेब निसर्गे, संजय बाबासाहेब निसर्गे, विजय बाबासाहेब निसर्गे (सर्व रा.पारुंडी ता.पैठण) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, पारुंडी (ता.पैठण) येथील बावीसवर्षीय विवाहिता मंगळवारी (ता.२०) दुपारी शेत गट क्रमांक ७३ मध्ये बांधावर असलेले मोसंबीच्या झाडांचे सरपण आणण्यासाठी गेली होती. यावेळी जवळच उभे असलेल्या तिघा सख्ख्या भावांनी तिला एकटी असल्याचे पाहून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच घटनेबाबत घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर पीडिता घरी गेली. तिने घडलेला प्रकार पती व सासूला सांगितला. आपली समाजात बदनामी होईल म्हणून त्यांनी दोन दिवस तक्रार दाखल करण्याचे टाळले. मात्र, गुरुवारी (ता.२२) सायंकाळी तिघा भावांविरुद्ध अखेर पीडितेने पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, महिला दक्षता व भरोसा सेलच्या सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी ''इन कॅमेरा'' महिलेचा जवाब नोंदवून तिघा भावांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हे नराधम आरोपी फरार झाले असून पाचोड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT