St strike esakal
महाराष्ट्र बातम्या

एसटीच्या संपकऱ्यांवर कारवाईची धार तेज; बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 3558

गेल्या अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या संपातून एसटी कर्मचारी माघार घ्यायला तयार नसल्याने एसटी प्रशासनाकडून आता दैनंदिन बडतर्फीच्या कारणे दाखवा नोटीस दिल्या जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या संपातून एसटी कर्मचारी माघार घ्यायला तयार नसल्याने एसटी प्रशासनाकडून आता दैनंदिन बडतर्फीच्या कारणे दाखवा नोटीस दिल्या जात आहे.

मुंबई - गेल्या अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या संपातून (Strike) एसटी कर्मचारी (St Employee) माघार घ्यायला तयार नसल्याने एसटी प्रशासनाकडून आता दैनंदिन बडतर्फीच्या (Suspend) कारणे दाखवा नोटीस (Notice) दिल्या जात आहे. रविवार पर्यंत 5782 एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आल्या आहे. तर 3558 कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने आतापर्यंत बडतर्फीची कारवाई केली आहे.

राज्यात एसटीची सेवा पूर्ववत सुरू करण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी नुकतेच कंत्राटी 400 आणि निवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना एसटीच्या सेवेत सामावून घेण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यानुसार आतापर्यंत राज्यभरातील आगरांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्त केल्या जात असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

यादरम्यान संपावर असलेले एसटी कर्मचारी कामावर हजर होण्यास तयार असल्यास त्यांनाही हजर करून घेतल्या जात आहे. मात्र, आता कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे एसटीची सेवा ठप्प राहू नये असा निश्चय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

त्यामुळेच रविवार पर्यंत राज्यभरात 250 पैकी 219 आगार सुरू झाले असून, सुमारे 6333 बस फे-या धावल्या आहे. तर रविवारी सुद्धा एसटी प्रशासनाने आपली कारवाई सुरूच ठेवत 208 एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, एसटी कर्मचारी संपावरच ठाम राहिल्यास आता बडतर्फीच्या करवाईमध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT