Uncertainty-driver-Crime 
महाराष्ट्र बातम्या

बेशिस्त वाहनचालकांना चाप

मंगेश सौंदाळकर

राज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित
मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश नुकतेच राज्य सरकारने पोलिसांना दिले होते, तर नियम मोडणाऱ्या ४२ हजार ७२३ जणांचे पोलिसांनी समुपदेशन केले आहे. 

अपघातांची संख्या वाढत असल्याने त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. एम. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतील चर्चेनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांचे परवाने तीन महिन्यांकरिता रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जास्त वेगाने वाहन चालवणे, लाल सिग्नल ओलांडून जाणे, मालवाहू वाहनातून जास्त मालाची वाहतूक करणे, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन करून वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे अशांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यातील विविध पोलिस आयुक्तालये आणि महामार्ग पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. महिन्याभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ९४ हजार ७०५ जणांवर पोलिसांनी खटले दाखल केले, तर २ हजार ९३० जणांचे वाहतूक परवाने तीन महिन्यांकरिता निलंबनासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांचे परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. परवाने रद्द झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होतील. जर परवाना रद्द झाल्यानंतरही चालक वाहन चालवताना आढळल्यास त्याच्यावर गंभीर कारवाई केली जाईल.
- विजय पाटील, पोलिस उपायुक्त, (मुख्यालय) महामार्ग पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ठाकरेंचे खासदार फोडणारा मास्टरमाईंड कोण? समोर आलं मोठं नाव; थेट दिल्ली कनेक्शन, आधी 'शस्त्र विक्रेता' म्हणूनही चर्चेत

Latest Marathi Live Updates: मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा

Shaktipeeth Highway Land Acquisition : अखेर सिंधुदुर्गमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात, कोल्हापूरच्या चंदगडमधून होणार प्रवेश

Satara: खटावला आफ्रिकन चातकाचे आगमन; पडळची ‘ई-बर्ड’ संकेतस्थळावर नोंद; शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा

Naral Barfi: नारळाची बर्फी तर अनेक ठिकाणी मिळते... पण बलरामपूरची चव वेगळी का आहे? जाणून घ्या खासियत

SCROLL FOR NEXT