crime news 
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग ! बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या सहायक कामगार आयुक्‍तांविरुध्द गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी विडी घरकूल येथील युपीएचसी सेंटरचे संनियंत्रण अधिकारी म्हणून सहायक कामगार आयुक्‍त निलेश येलगुंडे यांची नियुक्‍ती केली. त्यांनी आपली तब्येत ठिक नसल्याचे सांगत आठ-दहा दिवस विश्रांती घेत असल्याचे लेखी कळविले. मात्र, जोडलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचे पडताळणीत समोर आल्यानंतर येलगुंडे यांच्यासह डॉ. उत्कर्ष वैद्य यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित रुग्णांची तपासणी तथा त्याच्यावर उपचार केल्याची नोंद असणे आवश्‍यक आहे. मात्र, अरुणप्रभा रुग्णालयाचे डॉ. उत्कर्ष वैद्य यांनी सहायक कामगार आयुक्‍त येलगुंडे यांची कोणतीही तपासणी अथवा त्यांच्यावर उपचार केल्याची नोंद त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या महामारीच्या काळात जबाबदारी टाळण्यासाठी असे प्रकार होत असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या प्रमाणपत्राची पडताळणी केली. त्यामध्ये हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कर्तव्यावर हजर राहण्यास येलगुंडे यांनी टाळाटाळ केल्याने त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तर डॉ. वैद्य यांच्यावर बनावट प्रमाणपत्र देण्यास त्यांना मदत केल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेचे अधिकारी प्रवीण दंतकाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 


बाळाचे घड्याळ खरेदी पडली महागात 
सोलापूर : मुरारजी पेठेतील ज्योती महेश माने या शनिवारी (ता. 20) लहान बाळाचे घड्याळ खरेदीसाठी घराबाहेर पडल्या. सोलापुरातील मधला मारुती चौक परिसरातील सुगंधी दुकानासमोर आल्यानंतर चोरट्याने त्यांच्याकडील पर्स पळविली. त्यामध्ये दहा हजार रुपये होते, अशी फिर्याद त्यांनी जोडभावी पोलिसांत दिली आहे. अशी चोरी होण्याची मागील 16 दिवसांतील चौथी घटना आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT