Chandrasekhar Bawankule Aditya Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी लायकी काय? अपघाताने फक्त...; चंद्रशेखर बावनकुळे यांची कडवट टीका

Chandrasekhar Bawankule on uddhav Aditya Thackeray : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे राज्याच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री होते. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची लायकी आहे का? असा सवाल त्यांनी केलाय. criticism of bjp Chandrasekhar Bawankule on uddhav Aditya Thackeray on devendra fadanvis issue)

उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच बोलायला राहिलं नाही. त्यामुळे ते जनतेसमोर काहीही बोलत आहेत. आदित्य ठाकरेंना कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, कोणी मंत्री देखील केलं नसतं. आदित्य ठाकरेंची लायकी काय आहे? कोणत्या पंचायत किंवा संसदेत त्यांनी काम केलंय. कोणाचं रेशन कार्ड, आधारकार्ड तरी काढलंय का? एका मतदारसंघात हवेत निवडून आले. एखाद्यावेळी अपघाताने आमदार होऊ शकतं कोणी. पण त्यांची मुख्यमंत्री होण्याची लायकी आहे का? असा बोचरा वार बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झाली आहे. कोणीही सभा घ्यायला तयार नाही. सभेला यायला कोणी तयार नाही. उद्धव ठाकरेंना माहितीये लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ठाकरेंचे १८ खासदार निवडून आले होते. शरद पवार आणि काँग्रेससोबत बसून त्यांनी जनाधार संपवला आहे, असं ते म्हणाले.

निवडणुकीत विकासाचे वचननामे जनतेसमोर न मांडता, ज्या गोष्टी निरर्थक आहेत. ज्या गोष्टी महाराष्ट्राची जनता अपेक्षित करत नाही त्या गोष्टी लोकांना सांगितल्या जात आहेत. विकासाचा मुद्दा आहे, शेतीचे प्रश्न आहेत. शरद पवार कृषीमंत्री असताना महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर गेला होता. पण, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कामे केले आहेत, असं ते म्हणाले.

सर्वात जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोणी अन्याय केला असेल तर ते शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांवर न बोललेलं बरं. त्यामुळे पुळका दाखवू नये. शेतकऱ्यांचे कल्याण करणे हे पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे, असं बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेम आहे. त्यांना आदित्य यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे ते आता देवेंद्र फडणवीसांच्या तोंडी ते टाकत आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांच्या घरचं कोणी मंत्रिदेखील होणार नाही. उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्रीपद घेतलं. स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, एका कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं, पण त्यांनी मुलाला मंत्री केलं

अडीच वर्षे खिशात पेन नसलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षात दोनदा विधानभवनात आलेला मुख्यमंत्री असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला आहे. राज्यातल्या इतिहासतला पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मोदी यांची त्सुनामी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे विरोधकांचं काही राहणार नाही, असंही ते म्हणाले. (politics News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Kolhapur Politics : मुश्रीफांची सून बिनविरोध झाल्यानंतर मंडलिक अॅक्शनमोडवर सगळ्या उमेदवारांना केलं गायब, कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

'सोलापुरातील ॲड. राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ'; न्यायाधीशासमोर दोन साक्षीदारांची महत्त्वाची साक्ष..

SCROLL FOR NEXT