Criticism of CM uddhav thackeray by tweeting Atul Bhatkhalkar Criticism of CM uddhav thackeray by tweeting Atul Bhatkhalkar
महाराष्ट्र बातम्या

भातखळकर म्हणतात, अडीच वर्षांचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बुधवारी (ता. २२) नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यांनी नाराज असलेल्या आमदारांना चर्चा करण्याची विनंती केली. त्यांच्या संवादाला सुधीर मुनगंटीवार यांनी हास्यास्पद असल्याचे म्हटले. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ही ‘अडीच वर्षांचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!’ असे म्हटले आहे. (Criticism of CM uddhav thackeray by tweeting Atul Bhatkhalkar)

महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सोबतच देशात कोरोना विषाणू आला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडनेही कठीण झाले होते. या काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन देखील लावण्यात आले. लॉकडाऊनमुळे लादलेल्या नियमांमध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात येत होते. यावेळी नागरिकांशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग हा फेसबुक लाईव्ह होता.

या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी अनेकवेळा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांनी मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकाही घेतल्या. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच संवाद साधत असल्याचे पाहायला मिळत होते. यामुळे याचा कोणी सर्वाधिक फायदा घेतला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, असे गमतीत म्हटले जात होते.

हाच धागा धरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडी सरकारला सरकार स्थापन होऊन तीन वर्षे झाले आहेत. असे असताना ‘अडीच वर्षांचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!’ असे ट्विट करीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT