कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा गुजरात राज्याचे प्रभारी आणि राहुल गांधीचे खंदे समर्थक खासदार राजीव सातव यांचे (Rajiv Satav) रविवारी (ता. १६) सकाळी पुणे येथे उपचारादरम्यान निधन (In Pune hospital death) झाले. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे मुळगाव कळमनुरी येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवासमवेत राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार सिद्धिकी निशांत यांच्यासह त्यांचे सहकारी होते. विशेष करुन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड ह्या रविवारच्या दुपारपासूनच कळमनुरीत (Kalamanuri) तळ ठोकून होत्या. (Crowd for MP Rajiv Satav's funeral; Ministers will be present at the funeral)
खासदार राजीव सातव यांना ता. 23 एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना पूणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनी उपचारादरम्यान कोरोनावर मात केली. परंतु त्यांनी कोरोनावर मात केली असली तरी या दरम्यान त्यांना दुसऱ्या आजाराची लागण झाली होती. यातच त्यांचा रविवारी (ता. 16) मे रोजी मृत्यू झाला.
हेही वाचा - राजीव तुम्ही असे अकाली उठून जाल असे वाटले नव्हते, का केलेत असे ???
त्यांचे पार्थिव औरंगाबादमार्गे कळमनुरी येथे आणण्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड रविवारी दुपारपासूनच कळमनुरी शहरात तळ ठोकून आहेत. राजीव सातव यांच्या पार्थिवासमवेत राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार इशांत सिद्दिकी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्या ताफ्यासमवेत होते. आपल्या लाडक्या नेत्याचे अंतीम दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री कळमनुरी शहरात प्रचंड गर्दी असल्याने पोलिसांनी व जिल्हा प्रशासनाने बॅरिकेट लावून गर्दीला नियंत्रित केले. रस्त्यांच्या कडेला चाहत्यानी गर्दी केली होती. त्यांचे पार्थीव ज्या रुग्णवाहिकेत होते त्या वाहनावर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. जागोजागी लोकनेता राजीव सातव अमर रहे असे होर्डींग्ज लावण्यात आले होते.अमर रहे अमर रहेच्या घोषणांनी कळमनुरी दणाणून गेली होती.
त्यांचे पार्थीव राजसदन या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर चाहत्यांच्या अश्रूंचे बांध फुटले. सोमवारी (ता. १७) सकाळी सर्व विधीपूर्ण करुन साडेसात वाजता अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थीव निवासस्थानासमोरील भव्य मंडपात ठेवण्यात आले. याच त्यांच्या निवासस्थान परिसरात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. अंत्यसंस्कारसाठी मुंबई येथून महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उर्जामंत्री नितीन राऊत, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, विश्वजीत कदम, वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासमवेत मराठवाड्यातील सर्व पक्षिय नेते, कार्यकर्ते पदाधइकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.