Cyber Crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Cyber Crime : पुण्यातल्या बँकेवर सायबर हल्ला; 439 बनावट ATM कार्ड बनवून एक कोटीच्या वर रक्कम लांबवली

संतोष कानडे

पुणेः पुण्यातल्या भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाला आहे. खातेधारकांच्या ४९३ एटीएम कार्ड्सचे क्लोन करुन त्यातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम लंपास करण्यात आलीय.

भारती सहकारी बँकेची १ कोटी १५ लाख ७०० रुपयांची रक्कम लंपास झालेली आहे. सायबर चोरट्यांनी डिसेंबर २०२० ते २०२१ या काळामध्ये एटीएम कार्डचे क्लोन तयार करुन सदाशिव पेठ, आकुर्डी, धनकवडी, बाणेर, कोथरुड, नवी मुंबई, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर,वरळी आणि दिल्लीच्या एटीएम केंद्रांतून पैसे लंपास केलेले आहेत.

तब्बल ४३९ एटीएम कार्ड्समधील ही रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. १ हजार २४७ व्यवराहातून १ कोटी १५ लाख रुपये लांबवण्यात आले. यापूर्वी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला झाला होता. त्यातून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबवल्याची घटना २०१८मध्ये घडली होती.

भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाल्याची बाब बँकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांनात धाव घेतली आहे. कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT