महाराष्ट्र बातम्या

सायबर फ्रॉड वाढतोय, ‘हा’ नंबर सेव्ह करून ठेवा! 'या' बाबी आवर्जून लक्षात ठेवा, तुमची कधीही फसवणूक होणार नाही

‘OLX'वरून खरेदी-विक्री करताना सावधानता बाळगावी. गुगलवरून कस्टमर केअर, हेल्पलाइन नंबर शोधू नये. कोणीही ऑनलाइन लोन घेऊ नये, अनोळखी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल स्वीकारू नयेत, लाइट बिल न भरल्यास कनेक्शन कट होईल असे खोटे मेसेज ब्लॉक करावेत, ऑनलाइन नोकरी सर्च करू नये.

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीत अनेकजण ऑनलाइन खरेदी करतात. सुशिक्षित बेरोजगार ऑनलाइन नोकरी शोधतात. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देतात, अशावेळी फसवणुकीची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सायबर फ्रॉडपासून दूर राहण्यासाठी नेमके काय करावे, यासंदर्भात सायबर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

‘ओएलएक्स’वरून खरेदी-विक्री करताना सावधानता बाळगावी. गुगलवरून कस्टमर केअर, हेल्पलाइन नंबर शोधू नये. तसेच कोणीही ऑनलाइन लोन घेऊ नये, अनोळखी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल स्वीकारू नयेत, लाइट बिल न भरल्यास कनेक्शन रात्री कट होईल, असे खोटे मेसेज ब्लॉक करावेत, ऑनलाइन नोकरी सर्च करू नये, अशा सूचना सायबर पोलिसांनी केल्या आहेत. फेसबूक प्रोफाईल लॉक करावे, घरातील व्यक्तींचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया वार शेअर करू नयेत.

आपल्या ओळखीतील मित्र ते फोटो- व्हिडिओ पाहू शकतील, असे सेटिंग असावे. क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूवर, एनी डेस्क असे मोबाईल ॲप डाऊनलोड करू नयेत, असेही पोलिसांचे आवाहन आहे. डेबिट, क्रेडिट कार्डचे नंबर व पासवर्ड घरात एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवावेत, मोबाईलमध्ये ते साठवू नयेत, असाही मोलाचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

फसवणूक झाल्यानंतर काय करावे?

ऑनलाइन फ्रॉड तथा फसवणूक झाल्यास संबंधिताने सकाळी १० ते सायंकाळी सहापूर्वी ‘१९३०’वर फोन करून माहिती द्यावी. तसेच WWW. cybercrime.gov.in यावर मेल पाठवावा, असेही सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

सायबर पोलिस म्हणतात...

  • अनोळखी क्रमांकावरील कॉलवर डेबिट तथा क्रेडिट कार्डची ‘केवायसी’बद्दल माहिती देऊ नये

  • मोबाईलवरील अश्लील तथा अनोळखी लिंक उघडू नये.

  • ऑनलाइन डिलिव्हरी ॲप बघू नयेत, ऑर्डर देताना कॅश-ऑन डिलिव्हरी करा.

  • सोपा पासवर्ड ठेवू नका आणि दर तीन महिन्याला तो बदला. डेबिट व क्रेडिट कार्डवरील ‘सीसीव्ही’ लपवावा.

  • क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू नका.

  • मित्रांच्या लिंकला उघडून आपला ईमेल आयडी टाकू नका. तसेच काही महिने न वापरलेले मोबाईलमधील ॲप हटवावेत.

नागरिकांनी सतर्क राहिल्यास फसवणूक टळेल

नोकरी तथा काम हवे असल्यास स्वतः संबंधित कार्यालयात जाऊन चौकशी करावी. अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका. काही व्यक्ती स्वतःहून आपल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवून फसवणूक करतात. त्यांना परत त्यांच्या आयएफसीएस कोड व फक्त बँकेचा खाते क्रमांक विचारून त्यावर पैसे पाठवा. पोलिसांना भेटूनही त्यासंबंधीची कार्यवाही करता येईल. पैसे पाठविण्यासाठी थर्डपार्टी ॲप वापरण्याऐवजी फक्त बँकेचे क्यू आरकोड वापरून पैशांची देवाण-घेवाण करावी.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT