Social Media eSakal
महाराष्ट्र बातम्या

सायबर पोलिसांनी नेमले विशेष पथक! ...तर ३ वर्षे शिक्षा अन्‌ एक लाखांचा होईल दंड; उमेदवारांच्या सोशल मिडियावरील प्रचारावर नजर

सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (३० नोव्हेंबर) शेवटची मुदत असून ३ जानेवारीपासून उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी सायबर पोलिसांचे विशेष पथक नेमले आहे. उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टरवर पथक लक्ष ठेवून आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (३० नोव्हेंबर) शेवटची मुदत असून ३ जानेवारीपासून उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी सायबर पोलिसांचे विशेष पथक नेमले आहे. उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टरवर पथक लक्ष ठेवून आहे.

सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस उपनिरीक्षक, पाच हवालदार असे सहा जणांचे विशेष पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी नेमले आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात, ज्यांच्या पोस्ट आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त असतात त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. कोणीही दोन जातिधर्मांत तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. फेसबूक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह मेसेजवर सायबर पोलिस लक्ष ठेवून आहेत. दररोज या विशेष पथकांकडून वादग्रस्त व्यक्तींचे प्रोफाइल तपासले जात आहेत.

...तर होईल तीन वर्षांची शिक्षा

सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा अश्लील पोस्ट टाकणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००च्या कलम ६७ नुसार तीन वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच कलम ६६ (संगणकाद्वारे फसवणूक किंवा हानी) अंतर्गत ३ वर्षांपर्यंत शिक्षा व दंड लागू शकतो. यासोबतच भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांनुसारही कारवाई होऊ शकते. ज्यात धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टर्ससाठी कलम ५०५(२) आणि इतर तरतुदींचा समावेश आहे, ज्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते.

आक्षेपार्ह पोस्टवर दररोज लक्ष

सध्या महापालिकेची निवडणूक सुरू असून सोशल मीडियावर अनेकजण आक्षेपार्ह पोस्ट, मेसेज, व्हिडिओ टाकतात. त्यामुळे दोन गटात, जातिधर्मांत तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सायबर पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून दररोज सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टरवर लक्ष ठेवले जात आहे.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

Pune News : राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण व तुलना करावी; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

कॅन्सरला हरवलं पण मृत्यूशी झुंज अपयशी; 'रेडी' फेम अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड

Pune Crime : उद्योजकांकडून मोहजालात अडकवून खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला अटक

Baramati News : माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक....

SCROLL FOR NEXT