Tauktae esakal
महाराष्ट्र बातम्या

अलर्ट! Tauktae चक्रीवादळाने बदलली दिशा; राज्यात मुसळधार?

15 व 16 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

स्नेहल कदम

रत्नागिरी : पुढील चार दिवसात कोकण (Kokan) किनारपट्टीवर ‘ताऊत ’चक्रीवादळ (Taukae cyclone) धडकणार असून या कालावधीत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या मार्गाचा आणि तीव्रतेचा पहिला अंदाज जाहीर झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, (pachim maharashtra) कोकण (kokan) भागात 14 आणि 15 मे रोजी हे याचा प्रभाव दिसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological department) वर्तवला आहे. वादळ तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचे असणार आहे. त्यामुळे या प्रदेशातील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वादळामुळे संपुर्ण महाराष्ट्रात (maharashtra) टप्प्याने पाऊस पडणार आहे.

मात्र आता चक्रीवादळाची दिशा बदलली असून आता हे कर्नाटक (karnatak) व महाराष्ट्रा लगतच्या समुद्रातून गुजरातकडे (gujrat) सरकणार आहे. तसेच वादळाचा परिणाम दक्षिण कोकणसह (kokan) गोव्याच्या (goa) किनाऱ्यावरही होण्याची शक्यता आहे. 15 व 16 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

किनारपट्टीपासून अंदाजे 150 ते 200 किमी अंतरावर या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून वादळाच्या प्रवासात जमिनीवर ताशी 20 ते 25 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. दरम्यान लक्षद्वीप बेटाजवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार झाले असून, पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. अतितीव्र स्वरूपातील हे चक्रीवादळ १८ मे दिवशी सकाळी गुजरात किनारपट्टीजवळ पोचण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. समुद्रामध्ये मासेमारीकरिता गेलेल्या मच्छिमार बांधवानी तातडीने किना-यावर येण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IITM Pune News: दशकभराचा मॉन्सून अंदाज आता शक्य; पुण्यातील संशोधनाची मोठी झेप, ‘आयआयटीएम’ची नवी ‘प्रणाली’!

Mangalwedha Exam Centre:दाढी, मिशीमुळे संशय अन्‌ तोतया विद्यार्थ्यांचा भांडाफोड; केंद्र मंगळवेढ्यात विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे!

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींची काळजी मिटणार ! एकनाथ शिंदेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'ही' मोठी घोषणा

Dajipur Sanctuary Rain : फोंडा घाट, दाजीपूर अभयारण्य परिसरात जोरदार पाऊस; चंदगड तालुक्यालाही पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT