डी. के. शिवकुमार,सतीश जारकीहोळी
डी. के. शिवकुमार,सतीश जारकीहोळी sakal
महाराष्ट्र

उमेदवारीसाठी चुरस: डी. के. शिवकुमार,सतीश जारकीहोळींची बंद खोलीत चर्चा

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : विधानपरीषदेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा लढविण्याचा विचार कॉंग्रेस पक्षाने चालविला आहे. पण या निवडणूकीसाठी कॉंग्रेसमधील इच्छुकांची संख्या वरीष्ठांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D.K.Shivkumar) व प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi)यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

विद्यमान विधान परीषद सदस्य विवेक पाटील यानी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी जारकीहोळी यांची भेट घेतली आहे. माजी मंत्री व माजी खासदार प्रकाश हुक्केरी यानी शिवकुमार यांची भेट घेतली आहे. विवेक पाटील हे मागील निवडणूकीत अपक्ष उमेदवार होते, पण ते मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात जनसंपर्क ठेवण्यात ते कमी पडले. तुलनेत भाजपचे विधानपरीषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी मात्र जिल्हाभर संपर्क दौरे काढले व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे आता विवेक पाटील यांना कॉंग्रेस पक्षाच्या पाठबळाची गरज निर्माण झाली आहे. पण पक्षाच्या वरीष्ठांकडूनच उमेदवारीबाबतचा निर्णय होणार आहे.

सतीश जारकीहोळी हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दोनवेळा विधानपरीषदेवर निवडून गेले होते. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क आहे. त्यामुळेच जारकीहोळी यांचे पाठबळ व त्यांच्या माध्यमातून पक्षाची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे. मागील निवडणूकीत पक्षाने डॉ. व्ही. एस. साधूनावर याना उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. आता त्यांचे चिरंजीव किरण साधूनावर उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

सतीश जारकीहोळी हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दोनवेळा विधानपरीषदेवर निवडून गेले होते.

दोनवेळा विधानसभा व तीनवेळा विधानपरीषद सदस्य असलेल्या वीरकुमार पाटील यांनाही कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी हवी आहे. त्यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय पक्षाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, सुनिल हणमन्नावर, अथणीचे माजी आमदार शहाजहान डोंगरगाव यांनीही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.

चन्नराज यांनी तर गेल्या दीड वर्षांपासून विधानपरीषदेची तयारी सुरू केली आहे. चन्नराज हेच कॉंग्रेस पक्षाचे विधान परीषदेचे उमेदवार असतील असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. हेब्बाळकर यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बेळगाव जिल्ह्यात विधानपरीषदेच्या दोन जागा असल्या तरी एकच जागा लढविण्याचा निर्णय पक्षाने आधी जाहीर केला होता. पण आता दोन्ही जागा लढविण्याचा विचार सुरू आहे. याबाबत शिवकुमार व जारकीहोळी यांची बंगळूर येथे बुधवारी बैठकही झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील उमेदवाराबाबतचा निर्णय जारकीहोळी हेच घेतील असे सध्याचे चित्र आहे. जारकीहोळी हे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. शिवाय लोकसभा पोटनिवडणूकीत त्यांनी साडेतीन लाखापेक्षा अधिक मते घेतली आहेत. त्यामुळे उमेदवार निश्‍चित करताना जारकीहोळी यांचाच शब्द अंतीम ठरणार हे नक्की आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT