Dada Bhuse and Abdul Sattar 
महाराष्ट्र बातम्या

Dada Bhuse : कृषी खाते अजित पवार गटाकडे; मंत्री दादा भुसे म्हणाले, चांगलं काम...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मंत्रीमंडळातील खातेवाटप आज पार पडले. यामध्ये शिवसेनेकडे असलेली अनेक खाती अजित पवार गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटात नााजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच शिंदे गटाकडे असलेले महत्त्वपूर्ण असे कृषी खाते अजित पवार गटाकडे सोपविण्यात आले आहे. यावर आता शिवसेनेच्या मंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे.

दादा भुसे म्हणाले की, कोणीही नाराज नाही. खातेवाटप, मंत्रीमंडळ विस्तार हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर तुम्हालाही कळेल, की झालाय. तिन्ही पक्षात खटके उडण्याच्या शक्यतेवर भुसे म्हणाले की, तिन्ही पक्षातील नेते समजदार आहेत. त्यामुळे असल्या बाबी उद्भवणार नाही.

दरम्यान शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषी खाते अजित पवार गटाला देण्यात आले. यावर दादा भुसे म्हणाले की, कृषी विभागाची जबाबदारी मी सांभाळलेली आहे. कृषी विभागामध्ये शेतकरी बांधवांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरावं लागतं. त्याकाळात मी देखील दुसऱ्यांना हे पद द्यायच असेल तर द्या म्हटलं होतं. राज्याची प्रगती होणे गरजेचे आहे. जर दुसरं कुणी चांगलं काम करत असेल, तर जबाबदारी देता येऊ शकते, असंही भुसे म्हणाले.

दरम्यान भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी १५२प्लसचा नारा दिला आहे. त्यावर दादा भुसे म्हणाले की, आमचे देखील १०० प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. तसेच कुणीही आमदार नाराज नाही. येणाऱ्या अधिवेशन काळात सर्व जण हसत खेळत महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेतील, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT