Dada Bhuse and Aditya Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Dada Bhuse Latest News: आपले दुधाचे दातही पडले नाहीत, त्यामुळे...; दादा भुसेंची आदित्य ठाकरेंवर टीका

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News - मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. आदित्य ठाकरे विविध विभागात दौरा करून टीकास्त्र सोडताना दिसतात. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले होते की, आता मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची वेळ आली आहे. त्यावर दादा भुसे म्हणाले, की प्रत्येकाने आपल्या वयाचं भान ठेवलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे.आपल्याला अजुन लांबचा प्रवास करायचा आहे. आपले अजुन दुधाचे दातही पडलेले नाहीत. त्यामुळे ज्याने त्याने आपल्या मर्यादेचे भान ठेवलं पाहिजे, असा सल्लाही दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या निधीवर दादा भुसे म्हणाले की, लोकप्रतिनिधींना त्यांच्या सूचनेप्रमाणे निधी मिळाला आहे. निधीबाबत काही असतं तर सर्वात आधी माध्यमांनी शोधून काढलं असतं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. सकाळपासून बैठका घेणं आणि निर्णय घेणं त्यांची पद्धत आहे.

दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर दादा भुसे म्हणाले की, आपण अशा अफवांवर विश्वास ठेवत नाही. तसं काही होणार नसल्याचा दावाही भुसे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT