Dada Bhuse on Devendra Fadnavis statement After Meeting with MNS Raj Thackeray on Toll issue
Dada Bhuse on Devendra Fadnavis statement After Meeting with MNS Raj Thackeray on Toll issue  
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'नॅचरल फ्लोमध्ये...'; टोलबद्दल फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याबाबत दादा भुसेंचं स्पष्टीकरण

रोहित कणसे

टोलवाढीच्या विरोधात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन केलं जात आहे. यादरम्यान राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्ठमंडळाने गुरूवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर आज पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दादा भुसेंमध्ये टोलबाबत सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दादा भुसे यांनी राज्यात हलक्या वाहनांना टोल नाही या फडणीसांच्या विधानावर स्पष्टीकरण देखील दिलं.

राज्यातील खराब रस्ता असलेल्या ठिकाणी टोल आकारणे आणि येलो लाईन नियमांबाबत दोन्ही नेत्यांनध्ये चर्चा झाली. यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल सविस्तर माहिती दिली.

दादा भुसे म्हणाले की, काल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज आठ वाजता चर्चा करण्यात आली. राज ठाकरेंनी मांडलेल्या मुद्द्यांची अमंलबजावणी आजपासूनचं सुरू केली जाईल. काही मुद्द्यांसाठी एक महिन्याचा कालावधी लागेल.

या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकारात्मक भूमिका आहे. कोणाला पाठिशी घालण्याचा विषय नाही. आपण टोल देतोय तर सुविधा मिळाल्या पाहिजेत असं वाटणं यात काही गैर नाही. सारांश असा आहे की, या बाबतीत टप्प्याटप्याने अंमलबजावणी होताना दिसेल असेही दादा भुसे म्हणाले.

'आम्ही जी घोषणा केली होती, त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फोर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून पैसे दिलेले आहेत', असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दाखवला होता. फडणवीस यांच्या या विधानानंतर खासगी वाहन चालकांनी टोल भरायचा की नाही? टोल नाहीये तर आपण भरलेला टोल जातो कुठे असा प्रश्न विचारला जात होते.

दादा भुसेंचं स्पष्टीकरण

दरम्यान या फडणवीस यांच्या वक्तव्यावर मंत्री दादा भुसे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना भुसे म्हणाले की, मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, असं होऊ शकतं की नॅचरल फ्लो मध्ये फडणवीस यांच्याकडून तो शब्द आला असेल. पण राज ठाकरेंनी स्क्रीनवर जी पूर्वीची मुलाखत दाखवली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की, मुंबईचे एंट्री पॉइंट्स, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे साठी समिती नेमल्याचे त्यांनी यावेळी देखील सांगितले आहे.

तेव्हा ५०-६० ठिकाणी हलक्या वाहनांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजही एमएसआरडीसीच्या काही टोलवर हलक्या वाहनांना ही सूट दिली जातेय तर काही ठिकाणी टोल घेतला जातो ही वस्तूस्थिती आहे, असे दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं.

सर्व टोल वाल्यांना आम्ही सूचना करु, सर्वसामान्य लोकांशी सौजन्याने वागा, अशा सूचना दिल्या जातील. जे कर्मचारी नियुक्ती होईल, त्यांची चौकशी केली जाईल असेही दादा भुसे म्हणाले. तसेच काही गोष्टीत शिस्त पाळली गेली पाहिजे, प्रबोधन करणार आणि गरज पडल्यास कारवाई देखील होईल, टप्प्या-टप्प्यात या गोष्टीत सुधारणा होईल असेही दादा भुसे यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT