narayan rane, sanjay raut sakal
महाराष्ट्र बातम्या

...तर दादरा नगर हवेलीतील खासदार भाजपात येईल, राणेंचा सेनेला इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दादरा-नगर हवेलीमध्ये डेलकर यांचा विजय झाला आहे. त्यानंतर शिवसेनेचा (Shivsena) पहिल्यांदाच राज्याबाहेर विजय मिळविला असं सांगत संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर टीका केली होती. त्यावरूनच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

''देशात विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये डेलकर नावाच्या उमेदवार निवडून आल्या. त्यानंतर मी त्यांची निशाणी मागवून घेतली. तर बॅट घेतलेला फलंदाज त्यांची निशाणी आहे. इकडे संजय राऊत आमचा उमेदवार निवडून आले असा डंका पिटतात. तुमची शिवसेना तरी दादरा नगर हवेलीमध्ये पोहोचली आहे का?'' असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला.

''सामनाच्या अग्रलेखामधून म्हणतात, की आम्ही दिल्लीत धडक मारू. पण, दिल्लीत कशी धडक मारतात हे तरी तुम्हाला माहिती आहे का? दिल्लीत धडक मारायला गेले तर संजय राऊतांचं डोक ठिकाणावर राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील. संजय राऊत डेलकर तुमचा खासदार म्हणता तर टिकवून दाखवा नाहीतर काही दिवसांनी ते भाजपात यायचे'', असा इशारा देखील त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT