Dahi Handi 2022 High alert case registered if rules are broken cm eknath shinde mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

Dahi Handi 2022 : दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट; नियम मोडल्यास गुन्हा नोंदवणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीतील थरांबाबतचे निर्बंध हटवल्याने गोविंदाची सुरक्षा धोक्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहीहंडीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत अनेक गोविंदा जखमी होतात. काहींना तर कायमचे अपंगत्व येते. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीतील थरांबाबतचे निर्बंध हटवल्याने गोविंदाची सुरक्षा धोक्यात आली आहे; मात्र दहीहंडीवेळी न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्यास संयोजकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याची माहिती लोकल जागृती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूमुळे दहीहंडी उत्सवावर निर्बंध होते. राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले. तसेच दहीहंडी उंचीवरील निर्बंध हटवण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर लोकल जागृती सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर हरकत घेतली. न्यायालयाचे आदेश असतानाही मुख्यमंत्र्यांनी निर्बंध हटवणे चुकीचे असून न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे तत्काळ घोषणा मागे घेण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी जिथे न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन होईल, तेथील आयोजकांविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

नेमका आक्षेप काय?

  • दरवर्षी दहीहंडीवेळी अनेक गोविंदा जखमी होतात. काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व येते. त्यामुळे गोविंदाच्या सुरक्षेवर न्यायालयाने बोट ठेवत सर्व गोविंदा पथकांतील तरुणांचा विमा काढण्याचे आदेश दिले आहेत; तरीही न्यायालयाच्या आदेशांचे पालन होत नाही.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी गोविंदांना दहा लाखांचा संरक्षण विमा देण्याची घोषणा केली; मात्र आतापर्यंत अनेक गोविंदा पथकांचा विमा काढलेला नाही.

  • प्रत्येक दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकातील प्रत्येक खेळाडूचे विमा कचव तपासावेत. ज्याचा विमा नसेल त्यांना मानवी थर लावण्यापासून थांबवावे, असेही पाटील यांनी सांगितले.

उंचीची मर्यादा अस्पष्ट

राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, १४ वर्षांखालील मुलांना बालकामगार कायदा (१९८६) नुसार दहीहंडी स्पर्धेत सहभागी होऊ दिले जाणार नाही. न्यायालयाने दहीहंडीसाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्याच्या उंचीची मर्यादा किती असावी, हे अद्यापही सांगितले नाही. तसेच निश्‍चित केलेल्या नियमाचे पालन होत नसल्याचे पाटील म्हणाल्या.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी पुन्हा एकदा गोविंदाना उत्साहित केले जात आहे. मोठमोठी बक्षिसे ठेवून गोविंदाचा जीव धोक्यात घातल्या जातो. त्यामुळे ही जीवघेणी स्पर्धा थाबली पाहिजे.

- स्वाती पाटील, अध्यक्षा, लोकल जागृती सामाजिक संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT