Eknath Shinde_Devendra Fadnvis
Eknath Shinde_Devendra Fadnvis 
महाराष्ट्र

खूशखबर! दहीहंडी, गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात; निर्बंधातून मुक्तता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळं राज्यातील दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम यांसारखे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मर्यादा आल्या होत्या. पण आता हे सर्वसण निर्बंधमुक्त साजरे करता येणार आहेत. पण या सणांबाबत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं पालन मात्र करणं गरजेचं आहे, असे निर्देश मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह इथं या सार्वजनिक उत्सवांसंदर्भात विविध समन्वय समित्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. (DahiHandi Ganesh Festival is in full swing this year Freedom from restriction)

CM शिंदे म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनामुळं अनेक निर्बंध होते पण यंदा सर्व मंडळांची इच्छा लक्षात घेऊन दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम हे राज्यातील उत्सव साजरे झाले पाहिजे, अशी बैठकीत चर्चा झाली. कायदा-सुव्यवस्था राखून हे उत्सव साजरे झाले पाहिजेत अशा सूचना पोलीस, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

बैठकीत झालेले निर्णय, प्रशासनाला दिलेले निर्देश -

१) उत्सव मार्गांवरील खड्डे दुरुस्तीचे आदेश

२) मंडप, इतर परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, ऑनलाईन परवानग्या. क्लिष्ट अटीशर्ती, शुल्क नसणार.

३) कोविडकाळात आणलेली गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा हटवली.

४) सामाजिक बांधिलकी, नियमांचे पालन करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. नियमांबाबत बागुलबुवा नको.

५) मुंबईतल्या नियमावलींप्रमाणंच राज्यातही नियम असतील.

६) विसर्जन घाट, मिरवणूक मार्गांवरील लाईटच्या व्यवस्था होतील.

७) मूर्तीकारांच्या मागणीनुसार मूर्ती बनवण्यासाठी जागा देण्यात येणार

८) धर्मादाय आयुक्तांकडील नोंदण्या ऑनलाईन होणार

९) ध्वनीप्रदुषणाबाबत दाखल गुन्ह्यांचा तपास करुन किरकोळ गुन्हे हटवणार

१०) हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन करणं आवश्यक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT