Dapoli Resort Fraud Case
Dapoli Resort Fraud Case esakal
महाराष्ट्र

Dapoli Resort Fraud Case: शिवसेना नेत्याच्या अडचणीत वाढ; मध्यरात्री गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेता आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरूद्ध आयपीसी 420 आणि 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणात त्यांची ईडी चौकशी देखील झाली आहे. (Dapoli Resort Fraud Case of cheating registered against Anil Parab)

दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे.

दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अॅड. अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानुसार एकहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आदी आरोप परब आणि इतरांविरोधात आहे.

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाल्यानंतरही रिसॉर्ट पाडण्यात आले नव्हते. त्यानंतर सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाधिकारी कार्यलयाकडून रिसॉर्ट पाडण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT