Manoj Jarange sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : दरेकरांच्या अभियानाचा पर्दाफाश करू ; मनोज जरांगे, कोणत्याही आंदोलनाचे दडपण नाही

‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आमदार प्रवीण दरेकर यांनी १२-१३ संघटना गोळा केल्या आहेत. त्याद्वारे दरेकरांनी मोहीम सुरू केली आहे. त्याची माहिती घेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री (जि.जालना) : ‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आमदार प्रवीण दरेकर यांनी १२-१३ संघटना गोळा केल्या आहेत. त्याद्वारे दरेकरांनी मोहीम सुरू केली आहे. त्याची माहिती घेत आहे. मराठा संघटनांचे अतृप्त आत्मे कुठे कुठे उपस्थित होते ते लवकरच कळेल. सध्या जे सुरू आहे त्याचा दोन-तीन दिवसांत पर्दाफाश करणार आहे,’’ असे मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले.

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर मंगळवारी (ता.३०) तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आज काही मराठा आंदोलकांनी आंदोलन केले. अशा प्रकारे होत असलेल्या आंदोलनाचे दडपण घेणे मी आणि समाजाने बंद केले आहे. आमदार दरेकर यांनी मुंबईत काही ठिकाणी विरोधात बैठका घेतल्या आहेत. आंदोलकांच्या पाठीशी कोण उभे करायची, यावर या बैठकांत चर्चा झाली. मला उघडे पाडण्यासाठी हे केले जात आहे. काहींना एकत्र करून दंगली घडवून आणायच्या, असा यांचा डाव आहे.’’

सरकारने ‘ईडब्ल्यूएस’चा घोळ तातडीने मिटवावा, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मी केली आहे. लक्ष घालून मुख्यमंत्र्यांना भेटतो, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे जरांगे म्हणाले. ‘‘कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे समितीला नुसती मुदतवाढ नको तर या समितीला काम करायला लावा,’’ असेही ते म्हणाले.

दरेकरांवर टीका

  • दरेकरांच्या अभियानात कुणीही सहभागी होऊ नका

  • एका क्रांती मोर्चाचे दरेकर यांनी तीन क्रांती मोर्चे केले

  • ते मराठा आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक देऊन गोळ्या चालवत आहेत

  • तुम्ही जाब विचारायला कुणाच्याही दारात जाऊ नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

Love Affair Tragic End : प्रेमाचा धक्कादायक शेवट! अल्पवयीन मुलीसह तरुणाने राधानगरी जंगलात जीवन संपवलं, एकाच झाडाला गळफास; दोन दिवसांनी मृतदेह हाती

तिला लाजच नाही... 'आई माझी काळूबाई'च्या सेटवर अलका कुबल- प्राजक्तामध्ये झालेला मोठा वाद; नेमकं काय घडलेलं?

Road Accident : अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह चार भाविकांचा दुर्दैवी अंत, सात जण जखमी

SCROLL FOR NEXT