महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : दसरा मेळाव्याच्या वादात पवारांची उडी; CM शिंदेंना दिला सल्ला

दसरा मेळाव्यावरून एकीकडे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar On Dasara Melava Controversy : दसरा मेळाव्यावरून एकीकडे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे. अद्यापपर्तंत यावर मुंबई महापालिकेकडून कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर नेमकं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे मेळावा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व वादामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असून, मेळावे घेण्याचा सर्वांना अधिकार असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. तसेच वाद टाळावे असा सल्ला दिला आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अनिल परब यांच्याकडून 23 ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला अर्ज दाखल करण्यात आला आहे. तरस दोन दिवसांपूर्वी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाला दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे.

शिवाजी पार्कवर तुम्हीच मेळावा घ्या; राज ठाकरेंना भावनिक साद

आगामी दसऱ्या मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमकं कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. यावर अद्यापपर्यंत ठोस असा कोणताच निर्णय झालेला नाही. तोच शिवाजी पार्कवर राज ठाकरेंनी मेळावा घ्यावा अशी भावनिक साद मनसैनिकांकडून राज ठाकरेंना पत्राद्वारे करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र ट्वीट केले आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात या वादावर शरद पवार यांनीदेखील भाष्य करत वाद टाळण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे शिंदे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT