Mahadeo Jankar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mahadeo Jankar : "पंकजाताई अन् जानकर नसेल तर भाजपचं काही खरं नाही"

दत्ता लवांडे

सावरगाव (बीड) : सावरगाव येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत असून सावरगाव येथील भक्तीगडावर लोकांची गर्दी झाली आहे. भगवान बाबाची शक्ती आणि पंकजा मुंडेंच्या युक्तीनुसार हा कार्यक्रम होत असतो असं मत रासपचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमाला भाजप नेते सुजय विखेसुद्धा उपस्थित होते.

(Mahadeo Jankar Dasara Melava Latest Updates)

"विखे साहेब तुमचा पक्ष मोठा होणार आहे. प्रितम ताई आणि सुजय विखे हे दोघेजण खासदार आहात पण मी भाजपचा नाही मी मित्र पक्ष आहे. तुम्हाला सांगतो पंकजा ताई अन् महादेव जानकर नसेल तर तुमचं काही खरं नाही" असं जानकर म्हणाले आहेत. तर हे पैसे देऊन आणलेले माणसं नाहीत हा पदरच्या पैशाचा मेळावा आहे असंही ते म्हणाले.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज सावरगाव येतील भक्तीगड येथे पार पडत आहे. गोपीनाथ गडावरून सावरगाव येथील भक्तीगडावर प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी रॅली काढली असून मेळाव्याला सुरूवात झाली आहे. यावेळी रासपचे नेते महादेव जानकर, सुजय विखे, प्रितम मुंडे, सुरेश धस हे उपस्थित होते.

पंकजाताईला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पंकजाताईंच्या एका ट्वीटवर लाखो लोकं जमा होतात. त्यामुळे त्यांना मंत्रिपदी संधी देण्याचा भाजपने प्रयत्न करावा असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: श्रीलंकेने ऐनवेळी मैदानात का उतरवला '१२ वा खेळाडू', ज्याचा मानव सुथारने पहिल्याच चेंडूवर केला गेम ओव्हर?

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास बुधवारपासून होणार सुरवात

मी दिलेला निर्णय शाश्वत, सिब्बल यांचे आरोप बिनबुडाचे! राहुल नार्वेकरांचं जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले?

FDA Crime : हॉटेल ‘चूल मटन’ला एफडीए चा दणका; स्वच्छता, आरोग्यविषयक नियमांचे पालन होत नसल्‍याने परवाना निलंबित

Marathi News Live : क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT