Eknath Shinde Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dasra Melava : दसऱ्याला शिवतीर्थ कुणाचं? आज हायकोर्टात सुनावणी

दत्ता लवांडे

मुंबई : दसरा मेळाव्यासाठीच्या परवानगीचा वाद आता मुंबई हायकोर्टात पोहोचला असून यावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाने हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.

(Dasra Melava Permission Latest Updates)

दरम्यान, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने परवानगी मागितली होती. शिंदे गटानेही शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर शांततेच्या कारणावरून दोन्ही गटासाठी महापालिकेने परवानगी नाकारली होती. तर शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी महापालिकेने दिली होती. पण शिवतीर्थावर परवानगी न मिळाल्याने दोन्ही गटाने कोर्टाचे दार ठोठावले असून ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वादाच्या ठिणग्या पडू लागल्या. खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत असून हा वादही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.

शिवसेना आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे समीकरण आपण खूप दिवसांपासून बघत आलोय पण यावर्षी शिवतीर्थावर कुणाला परवानगी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर काल होणारी सुनावणी पुढे ढकलून आज होणार आहे. उच्च न्यायालयाकडून जर परवानगी नाकारली तर शिवसेनेचे पुढचे पाऊल काय असणार आहे याकडेही लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT