Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : तारीख ठरली! सेना फुटीनंतर ठाकरे, शिंदे, फडणवीस पहिल्यांदाच एकाच मंचावर

अधिवेशनावेळी शिंदे फडणवीस यांच्या गैरहजेरीमुळे तिघेही नेते समोरासमोर आले नाहीत

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने येतील असं वाटलं होतं. परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसून आलं. कारण उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमधील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते.

शिंदे फडणवीस यांच्या गैरहजेरीमुळे तिघेही नेते समोरासमोर आले नाहीत. परंतु हे तिन्ही नेते आता एकाच मंचावर येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे तिन्ही नेते एकत्र येणार का? आणि आले तर ऐकमेकांसमोर आल्यावर काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण करण्यात येणार आहे. या समारंभास प्रख्यात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना खास पाहुणे येणार आहेत. 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं तर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकाच मंचावर येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

Google Photos चे मोठे अपडेट! जुन्या फोटोंना द्या रेट्रो लुक; नवीन 'मूड्स' अन् AI फीचर्स लाँच..पाहा 'हे' नवे बदल..

बिग बॉसची माजी स्पर्धक दिव्या शिंदेला अटक; डॉक्टरला केली मारहाण, ५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT