Woman ESakal
महाराष्ट्र बातम्या

सासऱ्यांनी प्रेमविवाह केला, गावकऱ्यांचा संताप, पंचायतीने सुनेला धक्कादायक शिक्षा सुनावली, महाराष्ट्रातील घटना

Beed News: बीडमध्ये एका व्यक्तीने प्रेमविवाह केला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्याच्या सुनेला शिक्षा दिली आहे.

Vrushal Karmarkar

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे प्रेमविवाह केल्याबद्दल गावकऱ्यांनी एका पुरुषाच्या सुनेला शिक्षा केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. निकाल देताना पंचायतीने सांगितले की, समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. त्यामुळे अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यासोबतच या कुटुंबाला सात पिढ्यांसाठी समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेशही देण्यात आले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण गावात घडली. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र महिलेने धाडस दाखवत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मालन फुलमाळी नावाच्या महिलेचा सासरा नरसू फुलमाळी याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही बाब उघडकीस आल्यानंतर जात पंचायतीने नरसू फुलमाळीला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला.

मात्र अनेक वर्षे उलटूनही दंड न भरल्याने जात पंचायतीने मालन आणि त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्यांसाठी समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे. सामाजिक बहिष्कार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानुसार आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT