Electricity Use
Electricity Use Sakal
महाराष्ट्र

Electricity : राज्‍यात औद्योगिक क्षेत्रातील वीजवापरात ग्राहकांच्या संख्येत होतेय दिवसेंदिवस वाढ

सकाळ वृत्तसेवा

राज्‍यात उच्च दाब औद्योगिक ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्‍याचे चित्र प्रशासनाच्या आकडेवारीतून दिसत आहे.

मुंबई - राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या वीजवापरात गेल्या आर्थिक वर्षातील मासिक सरासरी ३,८३३ दशलक्ष युनिटवरून वाढ होऊन ती ४,१०१ दशलक्ष युनिट इतकी झाली आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी (ता. १४) दिली.

राज्‍यात उच्च दाब औद्योगिक ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्‍याचे चित्र प्रशासनाच्या आकडेवारीतून दिसत आहे. तसेच ग्राहकांकडून होणारा वीजवापरही वाढला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात उच्चदाब औद्योगिक ग्राहकांनी एकूण ३९ हजार ३९७ दशलक्ष युनिट; तर लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी ६ हजार ६०६ दशलक्ष युनिट वीज वापरली होती. एकूण औद्योगिक वीज वापर ४६,००३.२६ दशलक्ष युनिट इतका होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक औद्योगिक वीजवापर ३,८३३ दशलक्ष युनिट होता. २०२२ -२३ या चालू आर्थिक वर्षात राज्यातील औद्योगिक वीज वापरात वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात औद्योगिक ग्राहकांना ३२,८०८ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली असून हा वीजवापर मासिक सरासरी ४,१०१ दशलक्ष युनिट इतका आहे.

महावितरणकडून विविध सवलती

राज्यामध्ये औद्योगिक वीज ग्राहकांना वीजदरात विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. विद्युत आकारावर १५ टक्के लोड फॅक्टर सवलत, ठोक वीज वापर सूट, लवकर वीजबिल भरले तर सूट, अतिउच्चदाब ग्राहकांना वहन आकारातील बचत, विजेचा वापर रात्री दहानंतर केल्यास दरात सवलत अशा सवलती दिल्या जातात. अशा सर्व सवलतींचा लाभ घेतला तर उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सरासरी ५ रुपये प्रतियुनिट दराने वीज आकारणी केली जाते. या खेरीज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील तसेच ‘डी’ आणि ‘डी प्लस’ औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीजदरात सवलत दिली जाते. यामुळे राज्यातील नवीन जोडण्या घेणाऱ्या वीज ग्राहकांची संख्याही वाढल्‍याचे बोलले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT