राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्यात. बुधवारी 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील जिल्हाधिकाऱ्यांसह एकूण 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( Days after transfer of 44 IAS officers Maharashtra government reshuffles 20 more )
मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांची वैद्यकीय शिक्षण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर अस्तिमक कुमार पांडे यांची औरंगाबादत जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी 20 अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेशही जारी करण्यात आले आहेत.
यापूर्वी 44 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे एकूण 64 अधिकाऱ्यांच्या बदल्या आतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आल्या आहेत.
जाणून घ्या कोणाच्या बदल्या कुठे करण्यात आले आहेत?
विरेंद्र सिंह – IAS (2006) – वैद्यकीय शिक्षण, आयुक्तपदावरुन महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशचे एमडी म्हणून बदली
मिताली सेठी IAS-2017 – डायरेक्टर, वानामती, नागपूर
सुशील चव्हाण IAS-2007 – औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदावरुन मुंबईत असंघटीत कामगार डेव्हलपमेन्ट कमिशनर म्हणून बदली
अजय गुल्हाने, IAS-2010 – चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरुन आता अतिरीक्त पालिका आयुक्त नागपूर म्हणून बदली
दीपक कुमार मीना IAS-2013 – नागपूर पालिकेचे अतिरीक्त आयुक्त पदावरुन अतिरीक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून बदली
विनय गोवडा IAS-2015 – सीईओ, जिल्हा परीषद साताराहून आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली
आर.के. गावडे IAS-2011 – नंदुरबार झेडपी सीईओ पदावरुन आता मुंबई अतिरीक्त निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
माणिक गुरसल IAS-2009 – अतिरीक्त आयुक्त (उद्योग)
शिवराज श्रीकांत पाटील IAS-2011 – महानंद मुंबईचे एमडी म्हणून नियुक्ती
अस्तिक कुमार पांडे IAS-2011 – औरंगाबादचे जिल्हाधिकारी
लीना बनसोड IAS-2015 – एमडी, एम.एस को ऑप. ट्रायबल देवे. कॉर्पोरेशन, नाशिक म्हणून नियुक्ती
दीपक सिंगला IAS-2012- एमएमआरडीचे जॉईन्ट कमिशन म्हणून मुंबईत नियुक्ती
एस.एस माळी IAS-2009 – संचालक, ओबीसी बहुजन वेल्फेअर संचालनालय, पुणे म्हणून नियुक्ती
एस.सी. पाटील IAS-9999 – जॉईन्ट सेक्रेटरी म्हणून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबईत येथे नियुक्ती
डी.के खिलारी IAS-9999 – सातार झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती
एस.के. सलिमनाथ IAS-2011 – सिडको, मुंबई येथे जॉईन्ट एमडी म्हणून नियुक्ती
एस.एम.कुर्तकोटी IAS-9999 – नंदुरबार झेडपीचे सीईओ म्हणून नियुक्ती
राजीव निवतकर IAS-2010 -मुंबई जिल्हाधिकारीसह वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती
बी.एच पालवे IAS-9999 – अतिरीक्त विभागीय आयुक्त नाशिक म्हणून नियुक्ती
आ.एस. चव्हाण IAS-9999 – जॉईन्ट सेक्रेटरी, रेव्हेन्यू स्टॅम्ट आणि वनविभाग, मंत्रालय मुंबई म्हणून नियुक्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.