shivsena eknath shinde vs thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: ‘यूबीटी’च्या काळात ‘डीबीटी’ बंद होते; मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका

अजित पवारांचा केला बचाव

सकाळ डिजिटल टीम

‘यू बीटी’च्या काळात ‘डीबीटी’ पोर्टल बंद होते. त्यामुळे ६ लाख ५६ शेतकरी २०१७ मध्ये सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहीले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

त्याचवेळी त्यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी मागील सरकारने तरतूदच केली नाही, अशी टीका करताच विरोधकांनी मागील सरकारमध्ये वित्तमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी तरतुदीचा प्रस्ताव पुढे केला होता, परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तो अडविल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

मुख्यमंत्र्यांनी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर, विशेषतः ठाकरे यांच्यावर टीकेपासून सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘‘काहींनी अचानक मोर्चात येऊन आरोप केले,’’ असे सांगत ठाकरेंना टोला लगावला.

आरोपांना कामातून उत्तर देणार असल्याचे सांगत पातळी सोडून आरोप होऊ लागले असून, ही राज्याची संस्कृती नसल्याचे सांगितले. २०१९ला सत्तेत आलेले आता आरोप करीत आहेत. मी व अजितदादाही त्या सरकारमध्ये होतो, हे आधीच सांगतो’ असे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला.

नाना पटोले यांनी रोखले

मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे व मागील सरकारवर टीका केली. बऱ्याच वेळेच्या भाषणानंतरही त्यांची ही टीका सुरू असल्याने काँग्रेसचे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना रोखत शेतकऱ्यांवर बोला, असे सुचवले. त्यावरच येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थोड्या थोड्या वेळाने टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT