Shambhuraj Desai esakal
महाराष्ट्र बातम्या

'राष्ट्रवादीच्या पाटणकरांना विधानसभेला 'शोले'चा ट्रेलर दाखवू'

अरुण गुरव

'ट्रेलर दाखवणारे चित्रपट चालतात, असं नाही ते फ्लॉपही होतात. मात्र मी..'

मोरगिरी (सातारा) : विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्यजित पाटणकरांना (Satyajit Patankar) जनतेने एकदा १८ आणि पुन्हा १५ हजार मतांनी पराभव करून अस्मान दाखवल आहे. मात्र, जिल्हा बँक निवडणूक (Satara District Bank Election) निकालाने ते हुरळून जाऊन चित्रपटातील ट्रेलरची भाषा करत आहेत. ट्रेलर दाखवणारे चित्रपट चालतात, असे नाही ते फ्लॉप होतात. मात्र, मी त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘शोले’ चित्रपटाचा (Sholey Movie) ट्रेलर दाखवणार असून‌ तो सुपरहिट ठरेल, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सत्यजित पाटणकरांना लगावला.

नाटोशीत रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, जिल्हा परिषद सदस्या सुग्रा खोंदू, बशीर खोंदू, नथुराम कुंभार, सरपंच अविनाश कुंभार, उपसरपंच उदय देसाई, गणेश भिसे, चेतन देसाई, विष्णुपंत देसाई आदी उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, ‘‘विरोधकांचा बालेकिल्ला म्हणून पाटणकरांनी मोरणा विभाग विकासापासून वंचित ठेवला. त्यांनी विकासाच्या बाबतीत दुजाभाव केल्याने हा विभाग विकासापासून वंचित राहिला होता.

मी २००४ साली आमदार झाल्यावर विकासाचा रोडमॅप तयार केला. लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीवर नैतिक जबाबदारी आणि बांधिलकी जपत गट-तट न पाहता सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्‍ट डोळ्यासमोर ठेवून कामे केली. कोरोनामुळे राज्याचे उत्पन्न एक लाख कोटींनी घटले. मात्र, विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही. पाटण विधानसभा मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी मी कटिबध्द आहे.’’ रामचंद्र कदम यांनी प्रास्ताविक केले. अॅड. मारुती देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT