Ajit Pawar Meet Shriniwas Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Meet Shriniwas Patil: साताऱ्यात अजित पवारांनी घेतली श्रीनिवास पाटील यांची भेट; कारणही आलं समोर

Ajit Pawar Meet Shriniwas Patil: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची साताऱ्यातील कराड येथील निवासस्थानी भेट घेतली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची साताऱ्यातील कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपुर्वी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे अजित पवारांनी ही सांत्वनपर भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा देखील झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेतली.

अजित पवारांचा दौऱ्यावेळी भेट अचानक ठरल्याने काही मोजकेच लोक उपस्थित होते. यावेळी अजित पवार आणि खासदार पाटील यांनी जुन्या आठणींना उजाळा दिला. खासदार पाटील यांनी 'श्रीमान' पुस्तक लिहिलेले असून त्या पुस्तकाच्या आधारे दोन्ही कुटुंबातील आठवणींना उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेत जवळपास अर्धा तास चर्चा केली. या भेटीत खासदार पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत 'श्रीमान' हे पुस्तक भेट दिलं. या भेटीनंतर अजित पवार थेट कोल्हापूरकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT