Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना 25 मुस्लीम महिलांनी बांधल्या राख्या! म्हणाल्या, आमचं प्रेम आणि आशिर्वाद...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मुस्लीम महिलाकडून राखी बांधून घेतली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : आज रक्षाबंधन असल्याने प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. तर बहिणीला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट भावाकडून दिले जात असतात. बहिण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण मानला जातो. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घेतली आहे.

"ते आधी राज्याचे मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, मात्र आपला शिरस्ता त्यांनी चुकवलेला नाही आणि ते समाजासाठी चांगलं काम करतायेत. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी चांगलं काम केलं." असं मत मुस्लीम महिलांनी राखी बांधल्यानंतर व्यक्त केलं आहे. भाई हैदर आझम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज त्यांना राखी बांधण्यासाठी आलो आहोत असंही या महिला माध्यमांना बोलताना म्हणाल्या.

"देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळीसुद्धा आम्ही त्यांना राखी बांधण्यासाठी येत होतो आणि ते आता उपमुख्यमंत्री आहेत तरीसुद्धा आम्ही राखी बांधायला येतोय. आम्ही आमचं प्रेम आणि आशिर्वाद देण्यासाठी दरवर्षी त्यांना राखी बांधण्यासाठी येतो." असं मत मुस्लीम महिलेने व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT