DCP Parag Manere  Sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे सरकारने निलंबित केलेल्या डीसीपी पराग मणेरेंची पुन्हा नियुक्ती; शिंदे सरकारचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

DCP Parag Manere Reinstated By Shinde Govt : राज्यात सत्तेत आल्यानंतर ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द करण्याचा धडका घेतला आहे. त्यात आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित कथित खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारने निलंबित केलेले डीसीपी पराग मणेरे यांना एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, विरोधक या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उद्धव ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित केले होते. यासोबतच खंडणी व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले डीसीपी पराग मणेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करत त्यांना निलंबित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT