rte admission esakal
महाराष्ट्र बातम्या

RTE प्रवेश अर्जासाठी 31 मेपर्यंत मुदत! विद्यार्थ्यांना 10 शाळा निवडण्याची संधी; RTE प्रवेशासाठी कोण पात्र, कागदपत्रे काय लागतात, कोठे करायचा अर्ज, वाचा...

‘आरटीई’ प्रवेशासाठी पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना पालकांनी घर ते शाळा हे अंतर अचूक टाकावे.

तात्या लांडगे

सोलापूर : दुर्बल व वंचित घटकातील बालकांना ‘आरटीई’च्या माध्यमातून स्वयंअर्थसहाय्यिता शाळा, विनाअनुदानित शाळा, खासगी पोलिस कल्याणकारी शाळा, महापालिका शाळांमध्ये (स्वयंअर्थसहाय्यिता) प्रवेश मिळतो. त्यासाठी आजपासून (शुक्रवार) ३१ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

‘आरटीई’ प्रवेशासाठी पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना पालकांनी घर ते शाळा हे अंतर अचूक टाकावे. पालकांनी अर्जासोबत घराचा पत्ता, जन्मदाखला व जात प्रमाणपत्र जोडावेच लागणार आहे. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली असते. त्यात केंद्रप्रमुख, शासकीय शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळेचे प्रत्येकी एक मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शिक्षण, स्वयंसेवी संस्था, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी हे सदस्य असतात. तर शिक्षण विस्ताराधिकारी समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. अर्जात चुकीची माहिती दिल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.

प्रवेशासाठी कोणाला करता येईल अर्ज

  • अनुसूचित जाती- जमाती

  • विमुक्त जाती, भटक्या जमाती (ब, क, ड)

  • ओबीसी, एसबीसी (विशेष मागासवर्ग)

  • आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास

  • एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालके

  • अनाथ व दिव्यांग मुले

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे

निवासी पत्ता (रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज किंवा फोन बिल, घरपट्टी, आधारकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे पासबुक यापैकी एक), स्वत:च्या जागेत राहात नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयात झालेला किमान ११ महिन्यांचा भाडेकरार, जन्मतारखेचा पुरावा (ग्रामपंचायत, महापालिका, नगरपालिकेचा दाखला, रुग्णालयातील एएनएम रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील नोंदणीकृत दाखला, आई-वडील किंवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन यापैकी एक), एक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदारांचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थी व पालकाचे आधारकार्ड तर आधारकार्ड नसल्यास तात्पुरता प्रवेश घेतल्यापासून ९० दिवसांत देण्याची अट, अनाथ, एचआयव्ही बाधित बालकांचे दाखले, घटस्फोटीत (न्यायालयाचा निकाल) व विधवा महिलांसाठी (पतीचा मृत्यू दाखला) त्यासंबंधीचे प्रमाणपत्रे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT