money  
महाराष्ट्र बातम्या

मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना मिळणार ४ लाख रुपये?

कोरोनामुळे (corona) निर्माण झालेल्या परिस्थितीला आता प्रत्येक जण कंटाळला आहे.

शर्वरी जोशी

कोरोनामुळे (corona) निर्माण झालेल्या परिस्थितीला आता प्रत्येक जण कंटाळला आहे. दिवसेंदिवस कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावर अनेक अफवांना उधाण आलं आहे. यामध्येच सध्या कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये मदतनिधी देण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, ही माहिती खोटी असून या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं PIB ने स्पष्ट केलं आहे. (death-due-to-corona-virus-4-lack-rs-help-to-the-family)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. यात राज्य आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच ही मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपये देण्यात येत असल्याचं या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. परंतु, PIB ने या मेसेजमागील सत्यता तपासल्यानंतर व्हायरल होणारा हा मेसेज फेक असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर PIB ट्विट करत ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे. तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असंदेखील म्हटलं आहे.

"राज्य आपत्ती निवारण निधीअंतर्गत #COVID19 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये मदतनिधी देण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, PIB ने केलेल्या पडताळणीमध्ये हा मेसेज फेक असल्याचं समोर आलं आहे. राज्य आपत्ती निवारण निधीअंतर्गत अशी कोणतीही मदत दिली जात नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे", असं ट्विट PIB ने केलं आहे.

काय आहे मेसेज?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. सोबतच एक फॉर्म देण्यात आला आहे. यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची माहिती भरण्यास सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT