Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक; धक्कादायक कारणही आलं समोर...

सोमवारी रात्री ११२ या क्रमांकावर फोन करून मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होते. "मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे" असे बोलून कॉल कट करण्यात आला. सोमवारी रात्री ११२ वर फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.

कॉल करणारा शास्त्री नगर, धारावी इथे राहणारा असल्याची माहितीही समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी राजेश आगवणे या व्यक्तीला अटक केली आहे. त्याने दारूच्या नशेत आधी ॲम्बुलन्सला फोन केला. त्यानंतर ११२ वर फोन केला. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हा व्यक्ती धारावी, मुंबईत वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्यांची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असं त्याच्या पत्नी व ओळखीचे लोक सांगत आहेत.

काल रात्री प्रथम त्याने ११२ वर कॉल करून छातीत दुखतं असुन एम्ब्युलन्स पाठवा असं कळवलं होतं. त्यासाठी नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच नंबर वरून माननीय मुख्यमंत्री शिंदेंना धमकी देण्याचा कॉल केला. यानंतर त्याची माहिती घेऊन जेव्हा ताब्यात घेतलं गेलं तेव्हा तो दारुच्या नशेत असल्याचं आढळून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT