aditya thackeray and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : माझ्यासोबत मीडियासमोर डिबेट करा; आदित्य ठाकरेंचं CM शिंदेंना ओपन चॅलेंज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्यात काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच अनेक औद्योगिक प्रकल्प गुजरात राज्यात गेले आहेत. यावरून विरोधात असलेला उद्धव ठाकरे गट सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. त्यातच आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प एकनाथ शिंदे यांच्या सरकारमुळेच गुजरातला गेला. एकनाथ शिंदें हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्योग गुजरातमध्ये गेले, त्यावरून काही बोलायचंच नाही. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा संदर्भ देत शिंदे यांच्यावर आरोप केलेत.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेलेत. या विषयावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी १० मिनीटं चर्चा करावी, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. मुळात मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाबाबत माहित होतं का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळालेलं पत्र वाचून दाखवलं.

दरम्यान आम्ही ब्लेम गेम करत नसून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. जी गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती, ती दुसरीकडे पाठवण्यात आली, याचा पुरावा मिळाल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT