Prithviraj Chavan sakal
महाराष्ट्र बातम्या

Prithviraj Chavan : आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची फसवणूक ;पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

राज्य शासनाने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ‘‘या अहवालात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र हे सहाव्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शासनाने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ‘‘या अहवालात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र हे सहाव्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. मात्र केंद्र सरकारच्याच सांख्यिकी विभागाने दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र हे ११ व्या क्रमांकावर असल्याचे नमूद केले आहे. तुमची माहिती खरी असेल तर मोदींचे आकडे चुकीचे आहेत, हे जाहीर करावे. एकूणच चुकीची माहिती देऊन सरकारने महाराष्ट्राची फसवणूक केली आहे,’’ असा आरोप चव्हाण यांनी केला. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार सभागृहात उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘‘राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक आहे. महागाई दर आणि आताचा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर चालू किमतीनुसार ५.५६ टक्के इतका आहे. यातून महागाई निर्देशांक ५.१ हा वजा जाता राज्याचा खरा विकास दर जवळपास शून्य टक्के असल्याचे सांगत अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले. या गतीने विकास झाला तर आपली ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी तयार होईल, असा प्रश्न उपस्थित केला. आपली अर्थव्यवस्था ४० लाख कोटींवरून ४२ लाख कोटींवर गेली आहे. या पद्धतीने ती ट्रिलियन डॉलरपर्यंत कधी पोहोचेल, असा सवाल त्यांनी केला.

‘लाडक्या बहिणी’ला महिना ५ हजार द्यावेत

अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना सुनील प्रभू म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. तेल, डाळ, तांदूळ, चटणी अशा नऊ जीवनावश्यक वस्तूंचे दर २०१४ मध्ये दोन हजार ५०० रुपये इतके होते. आज २०२४ मध्ये हेच दर चार हजार ३५ रुपये झाले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला १५०० रुपये न देता दर महिना पाच हजार रुपये द्यावेत,’’ अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT