shivsena-bjp 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : अखेर ठरलं! 'या' तारखेला होणार युतीचा फैसला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीचे घोंगडे भिजत पडले असून येत्या 26 सप्टेंबर रोजी युतीचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 26 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होत असून त्या दिवशी युती होणार किंवा नाही याबाबतचा फैसला होणार आहे.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा मुद्दा ताणला गेला आहे. अनेक राजकीय तज्ज्ञांकडून भाजप नेतृत्त्वाची सध्याची चाल पाहता युती तुटणार अशी शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र, 26 सप्टेंबरला अमित शहा पुन्हा एकदा मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. यावेळी शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

अमित शहा मुंबईत येण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या दोन दिवसांमध्ये दोन्ही पक्ष जागावाटपावर चर्चा करणार आहेत. या दोन दिवसांत शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होईल, आणि चर्चेची माहिती शाह यांना देण्यात येईल. त्यानंतर शाह यांच्या सल्यानुसार युतीबाबत महत्वाची घोषणा होणार असल्याचे भाजपातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नुकत्याच नाशिक आणि मुंबई येथे झालेल्या सभांमध्ये युतीचा साधा उल्लेखही केला नव्हता. याउलट मुंबईतील सभेत "कुछ भी हो या कुछ भी ना हो, हमारी जीत पक्की है,' असे विधान करत अमित शहा यांनी वेळ पडल्यास भाजप स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही ऐनवेळी युती तुटणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

सध्याच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून समाधानकारक प्रस्ताव येत नसल्यामुळे भाजपही अडून बसला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने नमती भूमिका घेत शिवसेनेला अतिरिक्त जागा सोडली होती. तसेच कोकणातील नाणार प्रकल्पही रद्द केला होता. त्यामुळे आता शिवसेनेने राजकीय वस्तुस्थितीचा विचार करून भूमिका घ्यावी, अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यानुसार भाजपकडून 105/165 असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कोण माघार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDI Insurance: भारत विमा क्षेत्रात मोठी क्रांती करणार! १००% FDI ला मंत्रिमंडळाची मंजुरी, पॉलिसीधारकांवर काय परिणाम होणार?

Yashasvi Jaiswal संघात असूनही मुंबईने धापा टाकल्या; मोहम्मद सिराजच्या माऱ्यासमोर सारेच हतबल, हैदराबादचा विजय जवळपास पक्काच

Maharashtra News : लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवे कायदे तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सभागृहात मागणी!

Solapur News : लोकनेते गणपतराव देशमुखांचे स्मारक सांगोल्यात मध्यवर्ती ठिकाणी उभारावे; आ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत भूमिका!

Year End : फोटोग्राफीसाठी कोणता फोन खरेदी करावा? 2025 वर्षातले टॉप 5 स्मार्टफोन, बेस्ट कॅमेरा अन् परवडणारी किंमत

SCROLL FOR NEXT