purchase power avoid load shedding Energy Minister Cabinet meeting sakal
महाराष्ट्र बातम्या

भारनियमन टाळण्यासाठी वीज खरेदीचा निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ऊर्जामंत्र्यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यावरील विजेचे संभाव्य संकट टाळण्यासाठी तातडीने पावले उचलत, पहिल्या टप्प्यात वीज खरेदीचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. तसेच, पुरेशा प्रमाणात कोळसाही उपलब्ध करून भारनियमनही होऊ न देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. ऐन उन्हाळ्यात भारनिमयन होणार नसल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट केले.

उष्णतेच्या तीव्रतेमुळे मुंबईसह राज्यभरात विजेच्या वाढत्या मागणीने पुरवठा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यातच कोळसाटंचाईही असल्याने वीजनिर्मितीत अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारनियमनाशिवाय पर्याय नसल्याची स्थिती होती. त्यावर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन वीज खरेदीपासून कोळसा उपलब्ध करण्याच्या महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीनंतर राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

राऊत म्हणाले, “राज्यात २८ हजार ७०० मेगावॉट विजेची आवश्यक असेल. हा आकडा ३० हजार मेगावॉटच्या पुढे जाऊ शकतो. अशा स्थितीत उष्णतेमुळे विजेच्या मागणीत भर पडणार आहे. त्यामुळे भारनियमन करण्याची स्थिती ओढवू शकते. मात्र, ते टाळण्यासाठीच वीज खरेदीचा निर्णय झाला असून, त्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च येणार आहे. या व्यवहारासाठी ‘सीजीपीएल’कंपनीसोबत करारही केला जाणार आहे. ज्यामुळे वीज खरेदीच अडचणी येणार नाहीत. गेल्या वर्षी १६ ते २० रुपयांनी वीज खरेदी केली होती. त्यासाठी १९२ कोटी रुपये खर्च आला होता.’’

कोळशाचाही तुटवडा

‘‘लोकांना २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी उपाय केले जातील. त्यासाठी कोळसाही उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. वीज निर्मिती केंद्रात ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यात येत आहेत. ज्यामुळे सलग वीज उपलब्ध करता येणार आहे. यापुढच्या काही दिवसांत विजेची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत, ही बाब लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय करू,’’असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

देशातील काही राज्यांत कोळसा नसल्यानेही वीजनिर्मितीत अडचणी येत आहेत. काही प्रकल्पांत तर हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्याच कोळशाचा साठा असल्याने ऐन उन्हाळ्यात कोळशाचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT