Manoj Jarange Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय स्थगित? जरांगे आंतरवाली सराटीकडे रवाना, म्हणाले 'आधी संचारबंदी...'

Manoj Jarange Patil Maratha Reservation Andolan: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे

कार्तिक पुजारी

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. ते आधी अंतरवाली सराटी गावामध्ये जाणार आहेत. मराठा बांधवांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहेत. (decision to go to Sagar bungalow postponed manoj Jarange maratha reservation)

फडणवीसांचा नाही पण कायद्याचा मान राखतोय. सगळ्यांनी राज्यात शांत राहायचं आहे. आंतरवारी सराटीमध्ये जाऊन चर्चा करुन. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. मराठ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी. अंबडमध्ये संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी उठत नाही, तोपर्यंत मुंबईकडे रवाना होणार नाही, असं जरांगे म्हणाले.

काही परिस्थिती पाहून शहाणी भूमिका घ्यावी लागते. हट्टीवादी भूमिका घेऊन लोकांना त्रासात आणायचं नाही. सगळ्यांना आंतरवालीत समजावून सांगतो. कायद्याचा सन्मान केला पाहिजे. त्यानंतर सगळ्याना ज्यांच्या त्यांच्या घरी जाण्याचं सांगणार आहे. सागर बंगल्यावंर येण्याचं निमंत्रण देऊन फडणवीसांनी चूक केली आहे. संचारबदी उठवली की लगेच मुंबईकडे येतो, असं जरांगे म्हणाले.

तुमचा सन्मान म्हणून मी सलाईन लावून घेतो. संचारबंदी उठल्यानंतर सगळ्यांनी अंतरवली सराटीमध्ये यावं. आमच्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतले आहे. सगेसोयऱ्यांची अमलबजावणी करुनच घेणार. मराठ्यांवर अन्याय होतोय. मराठ्यांची लाट उसळू देऊ नको. मराठ्यांचा हकनाक बळी जाऊ द्यायचा नाही. त्यामुळे कायद्याचा मान राखून काही निर्णय घेत आहे, असंही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवारी सराटीत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. ते यावेळी प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मराठा बांधवांची विनंती डावलून ते मुंबईकडे निघाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी सामोपचाराची भूमिका घेतली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT