heat sakal
महाराष्ट्र बातम्या

‘शाळेचे नियोजन स्थानिक स्तरावर करा’

एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्यासाठी स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भासह इतर काही भागांत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यासाठी हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्यासाठी स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सूचना शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.राज्यात बहुतांश विभागांत उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्हा-तालुकास्तरावर सध्या सुरू असलेल्या शाळांच्या वेळा कमी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे राज्यातील शाळा उशिरा सुरू झाल्याने त्या एप्रिलअखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला होता. त्यामुळे राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू असून प्रचंड उकाड्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातही विद्यार्थ्यांना शाळेत येणे अशक्य झाले असल्याच्या असंख्य तक्रारी समोर आल्या होत्या.

यंदा हवामान खात्याने दिलेल्या उष्णतेच्या इशाऱ्यामुळे शाळा सुरू ठेवणे हिताचे ठरणार नाही. शिक्षण आयुक्तांनी २ मेपासून शाळांना उन्हाळी सुटी जाहीर केली आहे. त्यात बदल करून शाळांना सरसकट सुटी द्यावी.

- सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रिल्समध्ये प्रामाणिकपणाचा आव, कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी; ६ लाख घेताना तहसीलदाराला अटक; कोण आहे विजय चव्हाण?

T20 Squad: 501 धावा, 28 विकेट्स, 732 रन्स... तरीही या तीन मॅच विनर्सना टीम इंडियात जागा नाही; BCCI चा नेमका प्लॅन काय?"

Maharashtra Rain: मान्सून आला पण सक्रिय नाही; राज्यातील पावसाबाबत मोठं अपडेट, सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

IND vs AFG Test: भारताने केला डाव घोषित, अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! गिल, राहुल, पंत, सुदर्शनसह वॉशिंग्टनचीही 'सुंदर' खेळी

SCROLL FOR NEXT