Dahihandi Sakal
महाराष्ट्र बातम्या

दहिहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या दोन वर्षात कोविडच्या संकटामुळं उत्सव साजरा करण्यावर बंधन होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लहान-थोरांचा उत्साहाचा सण असलेल्या गोपळाकला अर्थात दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना पत्रद्वारे केली आहे. तसेच दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी अशी मागणीही त्यांनी केली. (Declare public holiday on Dahihandi MLA Pratap Sarnaik writes letter to CM Eknath Shinde)

सरनाईक म्हणाले, दहीहंडी हा लोकप्रिय सण असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळाल्यास सर्वांना उत्सवाचा आनंद लुटता येईल. मुंबई, ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर लहान शहरांमध्येही या उत्सवाला स्पर्धेचं रुप प्राप्त झालं आहे. महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातही हा सण लोकप्रिय झाला आहे. भारतात स्पेन सारख्या देशांतून स्पर्धक भारतात येत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळं या सणावर विरजण पडलं होतं. पण आता परिस्थिती बदलल्यानं तरुण वर्ग प्रचंड उत्साही आहे.

खऱ्या अर्थानं तरुण-तरुणींचा हा सण असल्यानं त्याला राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करावं, तसेच या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्यावी. यापूर्वीच पासूनच मी या मागणीचा आमदार या नात्यानं शासनाकडे पाठपुरावा करत आहे. दहीहंडीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातून केवळ मुंबई आणि ठाणे विभागालाच सुट्टी जाहीर केली जाते. पण सार्वजनिक सुट्टीसाठी शासन स्तरावर अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. यंदा १९ ऑगस्ट २०२२ रोजी दहीहंडीचा सण असून मुख्यमंत्र्यांनी सुट्टीबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Khutbav News : शेतकरी महिलेने शेतीकाम करत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वाजवला गौरवाचा डंका

Latest Marathi News Live Update : त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टला राज्यसरकारकडून ५० लाख रुपयांची मदत

IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान Viral झालेली ही मिस्ट्री गर्ल कोण? नेटिझन्सनी Grok चं डोकं खाल्लं...

Video: ''लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय'', भाजपच्या मंत्र्यांचं सभागृहात विधान

SCROLL FOR NEXT